Mohol News : अखेर मोहोळ तालुका पंढरपुर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडला; सर्व पक्षीय संघर्ष अटळ

मोहोळ तालुक्यातील 78 ग्रामपंचायती, मोहोळ नगरपरिषद,अनगर नगरपंचायत व मोहोळ तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या यांचे ठराव देऊनही त्याला केराची टोपली दाखविली.
MLA Rajan Patil and Charanraj Chavare

MLA Rajan Patil and Charanraj Chavare

sakal

Updated on

मोहोळ - मोहोळ तालुक्यातील 78 ग्रामपंचायती, मोहोळ नगरपरिषद,अनगर नगरपंचायत व मोहोळ तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या यांचे ठराव देऊनही त्याला केराची टोपली दाखवत, अखेर मोहोळ तालुका पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडला आहे.

यामुळे तालुका वाशिया मधून मोठी नाराजी व्यक्त होत आहे, तर तेवढाच तीव्र संतापही व्यक्त होत आहे. 'शासन सर्वसामान्यांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी' अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे. दरम्यान माजी आमदार राजन पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com