Solapur News : मोहोळ तालुका राष्ट्रवादीची कार्यकारिणी जाहीर; ३२ जणांच्या कार्यकारिणीत ३१ नव्या चेहऱ्यांना संधी

येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश चवरे (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) यांनी नव्याने ३२ जणांची नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे.
Mohol Taluka NCP Executive Announced 31 New Faces Get Opportunity in 32 Member Committee
Mohol Taluka NCP Executive Announced 31 New Faces Get Opportunity in 32 Member Committee Sakal

Mohol News : येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश चवरे (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) यांनी नव्याने ३२ जणांची नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

या कार्यकारिणीत हेमंत गरड वगळता अन्य ३१ नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याची माहिती त्यांनी दिली. यात सात उपाध्यक्ष, चार संघटक, एक सरचिटणीस, एक प्रवक्ता, एक खजिनदार, दोन चिटणीस, एक प्रसिद्धी प्रमुख, तीन सचिव, तीन सहसचिव व नऊ कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या महाविकास आघाडीत अर्थमंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या गटाच्या आमदारांना विकास निधीच्या माध्यमातून झुकते माप दिले आहे. इतरही आमदारांना त्यांच्या मागणीनुसार निधी दिला आहे. सर्व सामान्यांसाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी अनेक कामे केली आहेत. अनेक योजना ही राबवल्या आहेत.

आपल्या गटाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत हा त्या मागचा हेतू आहे. तसेच या कार्यकारिणीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री पवार यांनी केलेली कामे सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी या युवक कार्यकारिणीचा उपयोग होणार आहे. यावेळी बाळासाहेब भोसले, भारत सुतकर, प्रशांत बचुटे, रामदास चवरे, धनाजी गावडे, माऊली चव्हाण, दीपक माळी, अस्लम चौधरी, नागा साठे उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणी ः उपाध्यक्ष ः हेमंत गरड, राजाभाऊ भंडारे, मुकुंद पाटील, सोमनाथ दावणे, मोहन होनमाने, दत्तात्रय पवार, समाधान कारंडे. संघटक ः रामभाऊ शेळके, शरद गोडसे, अप्पा ढेकळे, बिरा होनमाने. सरचिटणीस ः विकास शिंगाडे. प्रवक्ता ः ब्रह्मदेव फंड. खजिनदार ः विकास पवार.

प्रसिद्धी प्रमुख ः राज अवताडे. चिटणीस ः राजकुमार पाटील, रामचंद्र गडदे. सचिव ः शशिकांत कोल्हाळ, शरद पाटील, निखिल पाटील. सहसचिव ः दादा नागणे, महावीर राऊत, भारत जाधव. कार्यकारिणी सदस्य ः तानाजी बनसोडे, सिराज पटेल, पोपट भुसे, सुरेश धोत्रे, दयानंद राऊत, ब्रह्मदेव चव्हाण, बाळासाहेब डोंगरे, गोविंद पाटील, रामभाऊ खटके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com