

Strong opposition has erupted against the proposal to attach Mohol taluka to the Pandharpur Additional Collector Office.
Sakal
मोहोळ : पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला मोहोळ तालुका जोडण्याचा मुद्दा आता पेटला असून, भाजपाचे नेते माजी आमदार राजन पाटील यांनी या प्रश्नी थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान तालुक्यातील ग्रामपंचायती, विविध सहकारी सोसायटया या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्यांचे ठराव संकलीत करून, हरकतीच्या माध्यमातून दाखल करण्यात येणार असून, राजकारण विरहित सर्वांनी ठराव द्यावेत असे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले. त्यामुळे या मुद्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.