Residents of Khandali have launched an indefinite hunger strike in front of the temple of Sonamata the village deity.
sakal
मोहोळ - आष्टी उपसा सिंचन योजनेतून खंडाळी गावासाठी तातडीने पाणी सोडावे, खंडाळी गावातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तातडीने भरून द्यावेत. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या डाव्या कालव्या वरील चारही अपूर्ण मायनर ची कामे तातडीने पूर्ण करावीत. यासह अन्य मागण्यासाठी खंडाळी पंचायत समिती गणाचे सदस्य गणेश मुळे यांच्या नेतृत्वाखाली खंडाळी ग्रामस्थांनी ग्रामदैवत सोनामाई माता मंदिरा समोर बुधवार ता. 14 ऑक्टोबर पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी आक्रमक झाल्याचे चित्र आहे.