Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

मोहोळ तालुक्यातील विविध गावातील मंदिरातील सोन्या-चांदीच्या मूर्ती इतर ऐवज चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
mohol police pujari trusti meeting

mohol police pujari trusti meeting

sakal

Updated on

राजकुमार शहा

मोहोळ - मोहोळ तालुक्यातील विविध गावातील मंदिरातील सोन्या-चांदीच्या मूर्ती इतर ऐवज चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असून, चोरट्यानी पोलिसां समोर आव्हान उभे केले आहे. या चोऱ्या रोखण्या साठी मोहोळ पोलीस सतर्क झाले असून, बुधवारी तालुक्यातील मंदिरांचे पुजारी, व्यवस्थापक, व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com