Ujani Canal Death : मोहोळमध्ये उजनीच्या कालव्यात पोहण्याचा बेत बेतला जीवावर; बेपत्ता दोन्ही कारागिरांचे मृतदेह तरंगताना आढळले, परिसरात खळबळ

Two Rajasthan Workers Drown in Ujani Left Canal : मोहोळ तालुक्यातील ढोकबाभूळगाव येथे उजनी डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या राजस्थानातील दोन कारागिरांचा बुडून मृत्यू झाला.
Rajasthan laborers death in Solapur canal

Rajasthan laborers death in Solapur canal

esakal

Updated on

मोहोळ : ढोकबाभूळगाव (ता. मोहोळ) येथील उजनीच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेले फरशी बसविणारे कारागीर शनिवारी (ता. १६) वाहून गेले होते. अखेर रविवारी (ता. १७) त्यांचे मृतदेह कालव्याच्या पाण्यावर तरंगताना आढळून (Ujani left canal drowning incident in Mohol) आले. पोलिस प्रशासनाने व गावकऱ्यांच्या मदतीने ते मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर ते त्यांच्या मूळ गावी पाठवल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com