

Solapur
esakal
राजकुमार शहा
पत्नीच्या प्रेम संबंधा मुळे तिच्या बरोबर होणाऱ्या सततच्या भांडणाला व तिच्या कडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून, तसेच तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने राहत्या. घरी लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ता 7 ते 8 जुलै च्या दरम्यान रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.या संदर्भात पत्नी व तिचा प्रियकर या दोघा विरोधात ता 10 जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. संजय राजाराम राऊत वय 26 रा यावली ता मोहोळ असे मृताचे नाव आहे. तर स्नेहल संजय राऊत व सौरभ सदाशिव शिंदे दोघे रा कोंडी ता उत्तर सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.