पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे गेले कोरोनामुळे परत

Money of the farmers in Solapur district went back because of the corona
Money of the farmers in Solapur district went back because of the corona

चळे (सोलापूर) : गेल्यावर्षी सोलापूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये भीमा नदीला महापूर आला होता. त्या महापुरामुळे नदीकाटी असलेल्या शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारस्तरावरून देण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही होऊन बाधित शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे करून त्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले होते.
चळे येथील ऑगस्ट 2019 मधील भिमा नदीला आलेले महापुरमुळे 493 खातेदार पैकी 90 खातेदार यांना प्रत्येकी एक लाखप्रमाणे एकुण 90 लाख कर्जमाफ व 403 खातेदार यांना कमाल एक हेक्टरपर्यंत नैसर्गिक आपत्ती नियमानुसार 13 हजार 500 रुपयाच्या तिप्पट 40 हजार 500  रुपयांप्रमाणे एक कोटी दोन लाख निधी मंजूर झाला होता. परंतु गेल्या महिन्यांमध्ये 403 खातेदारांपैकी 170 खातेदारांना पुरग्रस्ताचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.  उर्वरित 233 खातेदारांना मात्र त्या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. तसेच आंबे येथील एकाही शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीमध्ये आहे, खरीप हंगाम तोंडावर आला असून त्याचेही नियोजन शेतकरी बांधव करत आहे. परंतु त्याला या अनुदानाचे पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे त्याचे नियोजन कोलमडले आहे.
शेतकऱ्यांना बँकेच्या संदेशाची प्रतीक्षा
गावातील काही शेतकरी बांधवांना पुरग्रस्ताचे अनुदान मिळाल्यामुळे आपल्यालाही त्याचा लाभ मिळेल आणि आपल्या खात्यावर लवकर पैसे जमा होतील. म्हणून शेतकरी बांधव रोज मोबाईलमध्ये बँकेकडून येणारा मेसेजची वाट पाहत आहे. परंतु त्याच्या पदरी मात्र निराशाच येत आहे. संबंधित विभागाकडून अधिक माहिती घेतली असता, पूरग्रस्त शेतकरी बांधवाचे अनुदान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परत गेले असल्याचे सांगण्यात आले.
शेतकरी पितांबर जाधव म्हणाले, पुराच्या पैशाचे अनुदान माझ्या खात्यावर लवकर जमा होईल ते पैसे मला मिळतील म्हणून मी पुढचे नियोजन केले आहे. परंतु मला अजून पुराचे अनुदान मिळालेले नाही.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील म्हणाले, संघटनेच्या माध्यमातून या अनुदानाचा शासन दरबारी पाठपुरावा करून, वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com