जनरेटरला तीन मोटरी... अन्‌ दुसऱ्या दिवाशी मायलेकरांना विहीरीतून काढले

Mother and Child dies after being drowned in a well in Mangalveda taluka
Mother and Child dies after being drowned in a well in Mangalveda taluka
Updated on: 

मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा ते सांगोला रस्त्यावरील कचरेवाडी हद्दीत अज्ञात कारणावरून दीड वर्षांच्या मुलासह त्याच्या मातेने विहिरीत उडी घेऊन मृत्यूला कवटाळले.
मृत मुलीचे वडील शिवाजी जानु दोडके (रा. भाळवणी) यांनी दिली असून सदरची घटना तालुक्यातील कचरेवाडी येथे घडली. मृत तालुक्यातील भोसे गावचे रहिवाशी आहेत.

मृत विवाहितेचे पती प्रकाश बाबुराव मोरे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मजुरीसाठी तालुक्यातील कचरेवाडी येथील कट्टे यांच्या शेतात कामात होते. काल रात्री दहा वाजल्यानंतर विश्रांती मोरे (वय 25) व त्यांनी आपला लहान मुलगा प्रतिक मोरे याच्यासोबत घराबाहेर निघून गेली, अशी माहिती वडीलास देण्यात आली. सकाळी वडील कचरेवाडीला गेल्यावर शोधाशोध केल्यावर विहीरीतील पाण्यावर प्रतिकचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. त्या वेळेत उपस्थित याचा संशय वाढला. त्यामुळे विश्रांतीचा मृतदेह विहिरीत असण्याची शक्यता बळावली. विहीर पाण्याने काठोकाठ भरली होती. त्यात बुधवारचे भारनियमन अशा परिस्थितीत तीन मोटरी जनरेटरच्या साह्याने पाणी उपसल्यावर दु. तीनच्या दरम्यान विश्रांतीचा मृतदेह आढळून आला. तेव्हा आई वडीलासह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. सव्वा पाच वाजता ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून लहान मुलगा व आईचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी भोसे येथे नेण्यात आले. आठच्या दरम्यान यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
मृत्यून झालेल्या विश्रांतीला पाच वर्षाची एक मुलगी असून ती मुलगी आजी आजोबासमवेत भाळवणी येथे आहे. कदाचित जर ती मुलगी जर आईसोबत असती तर तिच्यावरही अनर्थ ओढवला असता नशीब तिचे बलवत्तर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com