
उत्तर सोलापूर : मुलीच्या जन्मानंतर झालेली दोन्ही मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने त्या दोन्ही मुलांना गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत टाकले. नंतर स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली. वांगी (ता. उत्तर सोलापूर) येथे बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चित्रा कविराज हाके (वय, २८), स्वराज हाके (वय दीड) यांचे मृतदेह सापडले असून पृथ्वीराज (वय ७) गाळात अडकल्याने शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.