Mothers Day Special : हत्तीचं बळ देणारी ती आई माझं दैवतच !

Mothers Day Special : हत्तीचं बळ देणारी ती आई माझं दैवतच !
Updated on
Summary

माझी आई कधी सल्लागार, कधी हळवी आई तर कधी सख्खी मैत्रिण होते हेच तर तिचे वैशिष्ट्य.

मी पेशाने डॉक्‍टर...आता तर कोरोनासारख्या (Corona) महामारीच्या साथीत माझ्यासारख्या हळव्या मुलीची आई (Mother) म्हणजे ग्रेटच...कारण माझ्याकडे श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयातील कोविड विभागात कार्यरत (Working in the Covid department)
आहे. सुरवातीला आईला थोडी काळजी वाटली असावी असं मला वाटलं. पण एकेदिवशी माझ्या पाठीवर थाप देऊन म्हणाली तू सैन्यात असती तर... ते दुश्‍मनांशी लढत आहेत. तू तर येथे आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची सुश्रृषा करीत आहेत. तुला वाढवल्याचा, शिकवल्याचा सार्थ अभिमान आहे. जा मुली काही काळजी करु नकोस.. देव आहे आपल्या पाठीशी... मला हत्तीचं बळ आलं. आत्मविश्‍वास वाढला. (mothers day special dr. priyanka vagdare has praised mother on mothers day)

Mothers Day Special : हत्तीचं बळ देणारी ती आई माझं दैवतच !
Mother's Day का साजरा केला जातो?; जाणून घ्या त्यामागील कारण

माझ्या मनात तेव्हा मात्र एक प्रश्‍न घर करुन गेला. माझी आई श्रीदेवी दहावीपर्यंतच शिकलेली. माझे बाबा मडोळप्पा पदवीधर. पण माझ्या आईचं बोलणं ऐकले तर एखाद्या पीएचडीलाही लाजवेल असे असते. वडील व्यापारी, ते त्यांच्या व्यवसायात सतत बिझी असत. आमचं लहानपणापासून शिक्षण, तयारी, संगोपन वडिलांपेक्षा आईकडे जास्त होतं. फार बारकाईनं सारं लक्ष देत असे. आम्ही तीन भावंडं. एक भाऊ दोन बहिणी. एक बहिण इंजिनिअर आहे, मी डॉक्‍टर अन्‌ आता भाऊसुद्धा डॉक्‍टर होतोय. परिस्थिती जेमतेम. फार श्रीमंती नाही. पण संस्काराची श्रीमंती आईचीच. माझी आई कधी सल्लागार, कधी हळवी आई तर कधी सख्खी मैत्रिण होते हेच तर तिचे वैशिष्ट्य. आम्हा तिघा भावंडात तिने कधीही दुजाभाव केला नाही. तू मुलगा, ती मुलगी असा भेदभाव कधीच होत नाही. मुळात आमच्या बाबांचे हे संस्कार आहेत. आज मदर्स डे निमित्त मला माझ्या आईसाठी दोन ओळी लिहाव्या वाटल्या..

आई माझा गुरु, आई कल्पतरु. सौख्याचा सागरु, आई माझी.

अदम्य इच्छाशक्ती, अनुभव आणि प्रचंड आत्मविश्‍वास निर्माण करणाऱ्या अशा आईचे उत्तराई तर आपण होऊच शकत नाही. परंतु तिचे ऋण मात्र फिटता फिटणार नाहीत, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. या निमित्ताने देवाकडे एकच मागणं भरपूर आयुष्य लाभो तिला, माझ्या प्रत्येक जन्मी, तिचाच गर्भ दे मजला !

Mothers Day Special : हत्तीचं बळ देणारी ती आई माझं दैवतच !
Mothers Day Special : स्वयंप्रेरणेतून आईने केले 35 वेळा रक्तदान

- दहावीपर्यंतच शिक्षण असताना मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष

- कोरोनासारख्या महामारीच्या काळातही लोकसेवेसाठी प्रोत्साहन

- मुलगी असूनही समाजात चार हात करण्याची ताकद देणारी माता

- पीएचडीला लाजवेल असे उपजत ज्ञान

- संस्काराच्या शिदोरीवर कुटुंबाची उभारणी

प्रत्येकाला आपल्या आईविषयी प्रेम, आपुलकी असणे साहजिकच आहे. परंतु माझ्या आईविषयी माझी ओढ जरा जास्तच आहे. परिस्थितीवर मात करीत आम्हा भावंडांना उच्चशिक्षित करण्याचा तिचा दूरदृष्टीचा गुण भावला खरा.

- डॉ. प्रियांका वागदरे, सोलापूर

(mothers day special dr. priyanka vagdare has praised mother on mothers day)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com