
सांगोला : अज्ञात कारणाने आपल्या पोटच्या दोन मुलांसह आईने विहिरीत उडी मारून आपली आणि आपल्या दोन्ही मुलांची जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना हबिसेवाडी (ता. सांगोला) येथे सोमवारीरात्री घडली. चित्रा हणमंत शिंदे (वय २७), मुलगा स्वराज हणमंत शिंदे (वय साडेतीन वर्षे) व मुलगी हिंदवी हणमंत शिंदे (वय दीड महिना, रा. हबिसेवाडी, ता. सांगोला) असे या घटनेत मृत्यू झालेल्या आई व चिमुकल्यांची नावे आहेत.