खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामींच्या अडचणीत वाढ 

Jayasiddheshwar-Mahaswamy
Jayasiddheshwar-Mahaswamy
Updated on

सोलापूर : जात पडताळणी समितीने भाजपचे खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. समितीच्या आदेशानुसार अक्‍कलकोट तहसिलदारांनी सोलापूर न्यायालयात डॉ. महास्वामींविरुध्द फिर्याद दिली. त्यावर बुधवारी (ता. 4) सुनावणी पार पडली. त्यानुसार सदर बझार पोलिसांनी डॉ. महास्वामींविरुध्द गुन्हा नोंद करुन जात प्रमाणपत्राबाबतचा चौकशी अहवाल न्यायालयास सादर करावा, असे आदेश दिले. पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार आहे. 


लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना डॉ. महास्वामी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप घेत मिलिंद मुळे, प्रमोद गायकवाड यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जात पडताळणी समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. जात पडताळणी समितीने नियुक्‍त केलेल्या दक्षता पथकाने डॉ. महास्वामी यांनी दिलेले पुरावे बनावट असल्याचा अहवाल पडताळणी समितीला दिले. त्यानुसार पडताळणी समितीने डॉ. महास्वामी यांना मूळ जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. मात्र, समितीला शेवटपर्यंत मूळ प्रमाणपत्र मिळाले नाही. सुनावणीच्या शेवटच्या दिवशी दाखला गहाळ झाल्याची फिर्याद वळसंग पोलिस ठाण्यात नोंदविल्याची प्रत पडताळणी समितीला देण्यात आली. दरम्यान, समितीने डॉ. महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. आता उच्च न्यायालयातील 13 मार्चच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


न्यायालयाने दिला असा आदेश 
अक्‍कलकोट तहसिलदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर महास्वामी यांच्याविरुध्द 156/3 प्रमाणे गुन्हा नोंद करावा. तहसिलदारांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन त्याचा अहवाल न्यायालयास सादर करावा, असे आदेश सोलापूर न्यायालयाने बुधवारी (ता. 4) दिले. फिर्यादी सुनावणीवेळी गैरहजर असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले. या प्रकरणी पुढील सुनावणी 27 एप्रिलला होणार असल्याची माहिती तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com