सोलापूर : कुणीतरी कुणाच्या तरी आईचा मुलगा आहे, कुणीतरी वडील आहे. कसं वाटत असेल मला सांगा..? जगात कोणीही असू द्या. थोडं शांत बसून, आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे. तुमचे रणगाडे, प्लेन, मिसाईल हे खपवण्याकरिता तुम्ही हे करता का काय.? आज किती लोकांचा जीव जातोय, आज आपण पाहतोय...कधी कधी डोकं काम करायचं बंद होतं. त्या ठिकाणी बॉर्डरवर आपल्या कुटुंबातील कोण गेलं तर कसं वाटेल? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.