नोकराजवळ पाठविलेल्या 45 लाखांच्या दागिन्यांची चोरी ! रेल्वे पोलिसांनी हद्दीमुळे फिर्यादीला पाठविले सदर बझार पोलिसांत

0In__20Servant_20couple_20theft_20of_20gold_20bangles_20worth_20Rs_203_20lakh_20from_20the_20businessman_20bungalow_0.jpg
0In__20Servant_20couple_20theft_20of_20gold_20bangles_20worth_20Rs_203_20lakh_20from_20the_20businessman_20bungalow_0.jpg

सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. पाचवरून पायऱ्या उतरून खाली येत असताना बाबुलाल नंदाजी गायरी यांच्याजवळील कापडी पिशवीतून कोणीतरी तब्बल एक किलो सोने (अंदाजित किंमत 44 लाख 79 हजार 605 रुपये) चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी (ता. 19) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी महेंद्र हरिषचंद्र सोळंकी (रा. गुरुआशिर्वाद को-ऑपरेटिव्ह सोसायटी, मुंबई) यांनी सदर बझार पोलिसांत आज फिर्याद दिली.

बनावटगिरी असल्याचा पोलिसांना संशय 
मुंबईतून नोकरच्या हस्ते एक किलो सोन्याचे दागिने पाठविले. नोकर बाबुलाल गायरी यांनी मालक महेंद्र सोळंकी यांनी दिलेली दागिन्यांची पिशवी स्वत:जवळच ठेवली होती. रेल्वेतून उतरताना अथवा उतरल्यानंतर त्यांनी त्या पिशवीत दागिने आहेत की नाही का नाही पाहिले, रेल्वे स्थानकावरील थेट बाहेर जाणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरूनच गायरी का गेले, चोरी नेमकी कशी व कुठे झाली हे गायरी यांना का समजले नाही, या सर्व प्रश्‍नांवरुन पोलिसांनी या प्रकरणात बनाटगिरी असल्याचा संशय व्यक्‍त केल्याचे बोलले जात आहे. आता रेल्वे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत पुढील तपास सुरु केला असून तपासाअंती वस्तूस्थिती बाहेर येणार आहे.

मुंबईत महेंद्र हरिषचंद्र सोळंकी यांचा सोन्याचे दागिने तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांनी बनविलेले दागिने घेऊन त्यांचा मजूर गायरी हे कोईम्बतूर एक्‍स्प्रेसने सोलापूरला आले. सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरून ते प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून जिन्याच्या पायऱ्या उतरून जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा परिसराकडे येत होते. तत्पूर्वी, एका प्लॅस्टिकच्या डब्यात सोन्याचे दागिने ठेवून कापडी पिशवी नोकर बाबुलालजवळ दिली होती. त्या पिशवीत वरच्या बाजूला कपडे आणि त्यात पाण्याची बाटली ठेवण्यात आली होती. सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरून रिक्षा स्टॅण्डकडे येताना बाबुलाल यांच्या लक्षात आले की, पिशवी फाडून कोणीतरी त्यातील दागिने चोरले आहेत. त्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांत धाव घेतली. मात्र, रेल्वे पोलिसांनी आमची हद्द नसल्याचे कारण सांगून सदर बझार पोलिसांकडे पाठविल्याचे गायरी यांनी सदर बझार पोलिसांना सांगितल्याची चर्चा आहे. त्यानंतर बाबुलाल यांनी सदर बझार पोलिस ठाणे गाठले आणि हकीकत सांगितली. चोरीचे गांभीर्य ओळखून सदर बझार पोलिसांनी सोळंकी यांची फिर्याद झिरो क्रमाकांने दाखल करून घेतली. त्यानंतर सदर बझार पोलिसांनी हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला. आता पुढील तपास रेल्वे पोलिसांनी सुरु केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com