अबब!... सिध्देश्‍वर एक्‍सप्रेस सोलापूरला पोहचली ५ तास उशिरा

हुसेनसागरसह पाच गाडयांना चार तास उशिर ; प्रवासी वैतागले ; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
Mumbai Solapur Siddheshwar Express five hours late solapur
Mumbai Solapur Siddheshwar Express five hours late solapursakal
Updated on

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून शुक्रवारी रात्री 10. 40 वाजता निघालेली मुंबई-सोलापूर सिध्दे'श्‍वर एक्‍सप्रेस तब्बल पाच तास उशिराने शनिवारी दुपारी 11.40 वाजता सोलापूरमध्ये पोहचली. तर अन्य सहा गाडया देखील चार तास उशिराने पोहचल्याने प्रवासी वैतागले होते. दरम्यान मध्य रेल्वे विभागातून धावणा-या सर्वच गाडया उशिराने धावत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्‍त आहे.

दापोडी ते पुणे रेल्वे मार्गावर शुक्रवारी दापोडी स्थानकावर रेल्वे रिले रुमला अचानक आग लागली. त्यामुळे पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणा-या रेल्वेगाडयांवर याचा परिणाम झाला. येणारी सिध्दे'श्‍वर एक्‍सप्रेस पाच तास उशिरा तर इतर सहा गाडया तब्बल चार तास उशिराने सोलापूरला पोहचल्या. दापोडी येथील रेल्वे स्टेशनच्या रिले रूमला शुक्रवारी आग लागली. त्यामुळे दापोडी पासून पिंपरी चिंचवड पर्यंतचे सिग्नल बंद झाले होते. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन रेल्वेचे नियोजन विस्कळीत झाले. आग रात्री सातच्या सुमारास लागली. आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, रिले रुमचे सर्व सामान जळून खाक झाले. आग लागल्याचे कारण समजले नसल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. रिले रूमला आग लागल्याने दापोडी येथील गेट बंद पडला होता. त्यामुळे पुण्याकडे आणि पुण्याहून सोलापूरकडे येणा-या रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाल्याने सोलापूरकडे येणा-या गाडया तब्बल चार ते पाच तास उशिराने पोहचल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

सिध्देश्‍वर एक्‍सप्रेस, हुसेनसागर एक्‍सप्रेस, विशाखापटटणम एक्‍सप्रेस, उद्यान एक्‍सप्रेस, गदग एक्‍सप्रेस, नागरकोईल, कुर्ला, चेन्नई मेल एक्‍सप्रेस, गाडयांना शनिवारी चार तास उशिराने धावत होत्या. गाडया उशिरा धावत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांनी नाराजी व्यक्‍त केली. अनेक लहान मुले, वयोवृध्द प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. शिवाय एकाच स्थानकावर गाडया तासनतास उभ्या राहिल्यामुळे प्रवाशांना काहीच कळत नव्हते. त्यामुळे अनेकांनी स्टेशन मॅनेंजर आणि स्थानकावर विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र दापोडी स्थानकावर काम सुरु असल्याचे यावेळी प्रवाशांना सांगण्यात आल्याचे यावेळी स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

मुंबई स्थानकावरुन वेळेवर निघालेल्या गाडयांना दापोडी स्थानकावर झालेल्या आगीच्या घटनेमुळे थांबवून ठेवण्यात आले. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा सुरुळीत होती. मात्र पुण्याकडे येणारी रेल्वे सेवा मात्र ठप्प झाल्याने सिध्देश्‍वर एक्‍सप्रेसला पाच तास, हुसेनसागर, गदग, नागरकोईल, कुर्ला-कोईमतूर, चेन्नई मेल, विशाखापटटणम, उद्यान एक्‍सप्रेसला प्रत्येकी चार तास सोलापूरला पोहचण्यास उशिर झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने प्रवासी झोपले होते. त्यामुळे दापोडी स्थानकावर गाडी थांबली असल्याचे प्रवाशांना रात्री समजले नाही. सकाळी सहा वाजता पाहिले असता सोलापूर स्थानक आले नसल्याने गाडीस उशिर झाल्याचे प्रवाशांना समजले.

ठळक बाबी..

  • रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

  • रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

  • मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत

  • सोलापूरकडे येणारी वाहतूक सेवा विस्कळीत

गेल्या अनेक वर्षापासून सिध्दे'श्‍वर एक्‍सप्रेसने व्यवसायासाठी प्रवास करीत असतो. गाडी सुरपफास्ट असल्याने प्रवास जलद होतो. परंतु शुक्रवारी रात्री दापोडी येथे झालेल्या आगीच्या घटनेमुळे सोलापूरला पोहचण्यास खूप वेळ लागला.

- एजाज शेख, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com