
-प्रमिला चोरगी
सोलापूर : शहरातील औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत, पायाभूत सुविधांबरोबर महापालिकेच्या सुपरटॅक्सचा विषयही मोठा अडथळा आहे. पुणे, औरंगाबाद, पिंपरी-चिंचवड आदी शहरांच्या तुलनेत सोलापूर शहरातील सुपरटॅक्स सर्वाधिक आहे.
२०१९ मध्ये सुपरटॅक्स रद्द करण्यासाठीचा प्रस्तावही प्रशासनाने बासनात गुंडाळला. शहरातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महापालिकेचा सुपरटॅक्स कमी करण्याची मागणी उद्योजकांमधून होत आहे.