
सोलापूर : मोदी परिसरातील झोपडपट्ट्यांमधील ७७७ घरांची तपासणी करण्यात आली. २२ घरांमधील २६ बॅरल्समध्ये डेंगीच्या अळ्या आढळून आल्या आहेत. या परिसरातील ५२ जणांची रक्त तपासणी केली असून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, तर चार रुग्ण तापसदृश आढळून आल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली.