Solapur : आता घरगुती कचऱ्यालाही मोल !

महापालिका विकत घेणार कचरा; दुधाची पिशवी ५० पैसे अन्‌ प्लास्टिक ३० रुपये किलो
solapur waste
solapur wasteesakal

सोलापूर : कचरा विलगीकरण करून बायोएनर्जी प्रकल्पाला गती यावी अन्‌ शहर स्वच्छ राहावे यासाठी महापालिका आता दुधाची प्रती पिशवी ५० पैसे आणि प्लास्टिक ३० रुपये किलो दराने नागरिकांकडून विकत घेणार आहे. दसरा सणानिमित्त निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची योग्य संधी शहरवासीयांना मिळणार आहे.

महापालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व स्वच्छ वायू दिवसाचे औचित्य साधत नुकतेच बायो एनर्जी कंपनीने शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन होण्याकरिता व त्यापासून होणारे प्रदूषण रोखण्याकरिता पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या चार ट्रान्स्फार्मर स्टेशन (कचरा संकलन केंद्र) पैकी रूपाभवानी येथे कंपनीच्यावतीने पहिले सुका कचरा संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामधे वेगवेगळ्या प्रकारच्या रिसायकलेबल कचरा वेगळा करून ई.पी.आर. अंतर्गत रिसायकलिंग करणाऱ्या एजन्सींना पाठविण्यात येईल.

शहरात एकूण दहा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. महापालिकेच्या तुळजापूर रोड कचरा डेपोमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती होते. या कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात रोज २४० टन कचरा जमा होतो. यातील ६० टक्के सुका कचरा असतो. परंतु, योग्य पद्धतीने विलगीकरण होत नसल्याने प्रकल्पाला अपेक्षित सुका कचरा उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रकल्प चालविणाऱ्या बायोएनर्जी कंपनीने सुक्या कचऱ्याच्या बदल्यात नागरिकांना पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी स्वच्छता होते. या कालावधीत घराघरांतील कचरा रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी साचला जातो. हा कचरा नागरिकांनी वेगळा करून महापालिकेला दिल्यास त्या बदल्यात मोबदला मिळणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी साचणारा कचरा नाहीसा होऊन शहर स्वच्छ राहण्यास हातभार लागणार आहे.

‘या’ प्रकारचा कचरा घेणार विकत

रिसायकलेबल कचरा म्हणजेच पेट बाटल्या, काचेच्या वस्तू, कार्डबोर्ड, रद्दी पेपर, वेगवेगळ्या प्रकारच्या प्लास्टिक वस्तू, पाउचेस, पिशव्या या कलेक्शन सेंटरमध्ये जमा करणाऱ्यांना लाभांश देण्यात येईल. ई-कचऱ्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com