
मोहोळ - यल्लमवाडी, तालुका मोहोळ येथील आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका 52 वर्षे पुरुषाचा सोन्याच्या लालसेपोटी सालगड्यानेच खुन केल्याचा तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे या खुनाचा छडा लावण्यात अखेर यश आल्याची माहिती मोहोळचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी पत्रकारांना दिली आहे.