
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : सत्ता आहे तो पर्यंत फायदा घेण्यासाठी असे अनेक पुढारी, नेते, समाजातील नेतेगिरी करणारे मंडळी भारतीय जनता पार्टीत सामिल झाली, आणि पुढे पण येत राहतील फायदा करून घेतला की पुन्हा दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील. मात्र यात जुना निष्ठावंत कार्यकर्ता फक्त सतरंज्या उचलण्यासाठी उपलब्ध असल्याची खंत भाजपा शहराध्यक्ष नागेश डोंगरे यांनी व्यक्त करत अप्रत्यक्षरित्या पक्षालाच घरचा आहेर दिला.