Shivajirao Kalunge
sakal
मंगळवेढा - स्व. नागनाथ आण्णा नाईकवाडी यांनी 13 दुष्काळी तालुक्याला पाणी मिळवण्यासाठी स्व. आ. गणपतराव देशमुख यांच्या सोबतीने लढा सुरू केला. त्यांचा लढा त्यांच्या पश्चात आम्ही सुरूच ठेवला. त्यांचे उर्वरित तालुक्याला पाणी मिळण्याबाबतचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले.