"मुद्दामच लावला जातोय मराठा-ओबीसी वाद ! मराठा आरक्षणाबाबत सरकार ऐकत नसेल तर गावोगावी उपोषण'

Narendra Patil
Narendra Patil
Updated on

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी दबाव गट तयार केला पाहिजे. सरकार ऐकत नसेल तर उपोषण करावेच लागेल. त्यासाठीच सोलापुरात ही बैठक घेतली असून प्रत्येक गावाने उपोषण करावे. 10 तारखेपासून पाटण तालुक्‍यातील 80 गावे उपोषण करणार असून, सरकारविरुद्ध दबाव गट तयार व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. 

मराठा आरक्षण लढ्याच्या निमित्ताने श्री. पाटील सोलापूर दौऱ्यावर आले असता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाकडून दबाव गट तयार झाला तरच समाजाला आरक्षण मिळेल, असे त्यांनी सांगितले. सत्तेसाठी लोक एकत्र येतात आणि आपली पोळी भाजून घेतात. मराठ्यांचा पक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षालाही समाजाला आरक्षण मिळावे असे का वाटू नये, असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजाच्या विरोधात सरकारने अजेंडा चालवू नये, अन्यथा मराठा समाज सरकार विरोधात उभा राहील. ओबीसी-मराठा वाद पुढे करून महाविकास आघाडीचे सरकार आरक्षण टाळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मराठा- ओबीसी असा वाद मुद्दामच लावला जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

सध्याचे शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हाती राहिलेले नाही. मर्सिडीजमधील शेतकरी आंदोलन करत आहेत. सध्याचे आंदोलन खऱ्या शेतकऱ्यांचे नसल्याची टीका त्यांनी या वेळी केली. सरकारने सारथी संस्था बंद केली; मात्र दुसरीकडे अण्णासाहेब पाटील महामंडळास एक रुपयाही दिला नाही. मराठा आरक्षणाच्या लढ्याकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून मुद्दाम वेळेवर वकील दिला जात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

नरेंद्र पाटील म्हणतात... 

  • सारथी संस्थेला 8 कोटी दिले; मात्र एकाही विद्यार्थ्याला रुपया मिळाला नाही 
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एकही रुपया दिला नाही 
  • सर्व भरती प्रक्रियेतील मराठा विद्यार्थ्यांना तोटा झालाय 
  • राज्य सरकार मराठा समाजाच्या विरोधात असल्याचे चित्र उभे राहिले 
  • मराठा आणि कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना कर्ज मिळत होते, ते आता बंद झाले 
  • आरक्षणाच्या केसला वकील वेळेवर दिले जात नाहीत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Action under MPDA
solapur
खासगी, स्कूल बस
Farmers' Struggle: Protest Against Jakraya Sugar Factory Over Pending Payments
Marathi News Esakal
www.esakal.com