

पंढरपूर : कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आज (सोमवारी) पंढरपुरातही विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नरेंद्राचार्य महाराजांचे हजारो अनुयायी आक्रमक झाले आहेत. श्री. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून पंढरपुरात सोमवारी (ता. २४) सकाळी जोडेमारो आंदोलन करण्यात आले.