
सोलापूर : राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या खेळाडूंची भारतीय सैन्यात हवालदार व नायब सुभेदारपदी थेट नेमणूक होणार आहे. भरतीसाठी अविवाहित पुरुष व महिला खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता १५ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे. या माध्यमातून सोलापुरातील राष्ट्रीय पातळीवरील पात्र खेळाडूंनाही क्रीडा कोट्यातून करिअरची संधी प्राप्त होणार आहे.