Solapur : मोहोळच्या प्रथम नगराध्यक्षांनी कामगारांना वाटली एक टन साखर

रमेश बारसकर यांनी मोहोळ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना एक टन साखरेचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली.
solapur
solapursakal
Updated on

मोहोळ : मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी मोहोळ नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना एक टन साखरेचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड केली. त्यामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

पाडव्याच्या पूर्व संध्येला नगरपरिषदेच्या उद्यानात साखरेचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश प्रवक्ते शीलवंत क्षीरसागर म्हणाले, प्रथम नगराध्यक्ष बारसकर हे कायम कामगारांच्या हिताचे निर्णय घेत आले आहेत.त्यांच्या नगराध्यक्षाच्या कार्य काळातही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांना पुन्हा काम करण्याची संधी द्यावी.

यावेळी प्रथम नगराध्यक्ष बारसकर म्हणाले, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी कुठलीही तमा न बाळगता कायम नागरिकांच्या सेवेत तत्पर असतात. मोहोळ ग्रामपंचायत असल्या पासून माझा कामगारांसाठी चा लढा सुरू होता व तो पुढे ही सुरू राहील. त्यांना येणाऱ्या अडचणी निवारण्या साठी कायम त्यांच्या पाठीशी मी उभा राहणार आहे.

यावेळी अतुल क्षीरसागर, तनवीर शेख, रमेश सनगर, शांतीकुमार अष्टुळ, सुभाष मोहोळकर, सागर आष्टूळ, अजय कुर्डे, शीलवंत क्षीरसागर, सिद्धार्थ एकमल्ले, राजू शेख, दिनेश गायकवाड, तानाजी कसबे, यांच्यासह कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Vidhan Parishad election results BJP victory
Solapur Airport to Mumbai Flights Begin September 1, Booking Now Live
Shocking Murder in Mohol: Woman and Two Sons Accused in Uncle’s Killing
tet exam
Marathi News Esakal
www.esakal.com