
हुकूम मुलाणी
मंगळवेढा : आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. माजी नगराध्यक्ष पांडुरंग ताड यांच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्याची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मतदारसंघ अध्यक्ष अजित जगताप, अरूण किल्लेदार, प्रविण खवतोडे, सोमनाथ माळी, भारत नागणे, बशीर बागवान, रामेश्वर मासाळ, संजय कट्टे, नजीर इनामदार, भारत बेदरे, भारत पाटील ज्ञानेश्वर भगरे, अॅड. संभाजी घुले आधी सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.