
सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील 26 प्रभागांत राष्ट्रवादी कॉंग्रेसची संवाद यात्रा पोचणार आहे.
सोलापूर शहर होणार 'राष्ट्रवादी'मय! 5 सप्टेंबरपासून प्रभाग संवाद यात्रा
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या (Solapur Municipal Corporation) आगामी निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील 26 प्रभागांत राष्ट्रवादी कॉंग्रेसची (NCP) संवाद यात्रा (Samvad Yatra) पोचणार आहे. या यात्रेचे नियोजन करण्यासाठी महत्त्वाची बैठक सोलापुरातील कै. सुभद्राई मंगल कार्यालयात पार पडली. 5 सप्टेंबरपासून या संवाद यात्रेला सुरवात होणार आहे. सकाळी व संध्याकाळी अशा दोन वेळेस ही संवाद यात्रा 13 दिवसांमध्ये 26 प्रभागांत पोचणार आहे.
हेही वाचा: महामार्गावरून वाहन चालवताय ! नियम मोडल्यास 'इतका' बसेल दंड
प्रभाग संवाद यात्रेची प्रमुख जबाबदारी शहर मध्य, सोलापूर उत्तर व सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी अध्यक्षांवर सोपविण्यात आली आहे. शहराध्यक्ष भारत जाधव व शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या वेळी माजी महापौर महेश कोठे व नगरसेवक तौफिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, माजी महापौर सुभाष पाटणकर, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, महिला अध्यक्षा नगरसेविका सुनीता रोटे, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा: वटवाघळांमुळे रखडले अॅडव्हेंचर पार्क! निवडणुकीपूर्वी उद्घाटननाट्य
या वेळी शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे, राजन जाधव, सुभाष पाटणकर, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, सेवादल शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, ज्येष्ठ महिला लता फुटाणे, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार तसेच विद्यार्थी शहर अध्यक्ष निशांत सावळे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, दादाराव रोटे यांनी मनोगत व्यक्त केले. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी या प्रभाग संवाद यात्रेच्या माध्यमातून एकवटली आहे. यात्रेच्या निमित्ताने सोलापूर शहर राष्ट्रवादीमय करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. या वेळी राष्ट्रवादीच्या चित्रपट कला सांस्कृतिक सेलचे कार्याध्यक्ष जब्बार मुर्षद तसेच त्यांचे संगीत साथीदार धनंजय यांना दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार झाला.
Web Title: Ncps Prabhag Samvad Yatra Will Start From 5 September
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..