
सोलापूर : भारतात प्रथमच एका खासगी कंपनीतर्फे नुकतेच अंतराळात पाठविलेले ३ उपग्रह बनविण्याच्या प्रकल्पात सोलापूरचे सुपुत्र नीरज जनार्दन गाडी यांचे मोठे योगदान आहे. सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही गोष्ट असून सोलापूरकरांच्यादृष्टीने ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. बंगळुरुस्थित ‘पिक्सेल’ या खासगी कंपनीने हे ३ उपग्रह बनविले आहेत.