Crime
sakal
सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगा सोलापुरातील मामाकडे राहायला आला. या ठिकाणी त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल दुचाकी चोरीचे ८ गुन्हे केले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाला पकडले. त्याच्याकडे चोरीच्या तब्बल सहा दुचाकी सापडल्या आहेत.