
नेवासे शहर : तीर्थक्षेत्र नेवासेनगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त सोमवारी यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी सायंकाळी ६.१५ वाजता पाकशाळेतील उत्सवमूर्ती पालखीचे श्री मोहिनीराजांच्या मुख्य मंदिरात आगमन होताच बोल मोहिनीराज महाराज की जय.. असा जयघोष झाला. काल्याची दहीहंडी फोडून रेवड्यांची उधळण करण्यात आली. यावेळी श्री मोहिनीराजांच्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली होती.