Solapur: राज्य सरकारच्या नवीन संचमान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषद अन् खासगी अनुदानित शाळांमधील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. यामुळे अनेक शाळांचे अस्तित्वच धोक्यात येणार असून याचा थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे १५ मार्च २०२४ चा सरकारी निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. तसे न झाल्यास राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.