नूतन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील होम क्वारंटाइन 

New MLA ranjitsinh mohite patil Home Quarantine
New MLA ranjitsinh mohite patil Home Quarantine

अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : मुंबईहून आमदारकीची शपथ घेऊन अकलूजला परतलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. 
विधान परिषदेवर बिनविरोध गेलेल्या आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा सोमवारी मुंबईत आमदारकीचा शपथविधी पार पडला. शपथविधी उरकून आमदार मोहिते पाटील रात्री आपल्या गावी अकलूज येथे परतले. रेड व ऑरेंज झोनमधून प्रवास करून आल्याने आमदार मोहिते-पाटील यांनी मंगळवार (ता.19) रोजी अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील स्वीय सहाय्यक बापू शितोळे, चालक किसन कदम व मधुकर घोगरे हेही शपथविधीच्या कार्यक्रमास मुंबई येथे गेले होते. या सर्वांनीही आपआपली तपासणी करून तेही होम कॉरंटाईन झाले आहेत. रेड व ऑरेंज झोनमधून प्रवास व वास्तव्य करून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन करावे, असा अध्यादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी काढलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील सपत्निक होम क्वारंटाइन झाले आहेत. 
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व त्यावरील उपाय योजना यासंदर्भात अनेक महत्वपूर्ण बाबी राज्य सरकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर कळवून त्यावर उपाययोजना सुचवण्याचे महत्वपूर्ण कार्य वेळोवेळी केले आहे. कोरोनाचा संसर्ग सोलापूरच्या ग्रामीण भागात होऊ नये यासंदर्भातही त्यांनी विशेष लक्ष घालून प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका ठेवली आहे. आज आमदार झालो असलो तरी शासकीय नियमांना कुठेही छेद जाऊ नये या हेतूने ते 14 दिवसांसाठी होम कॉरंटाईन झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com