Solapur News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी नवी योजना! पाच वर्षांत १ लाख रिक्षांचे वाटप; ९० टक्के बँक कर्ज, तर १० टक्के कल्याणकारी मंडळाकडून आर्थिक मदत

निसर्गाची अनियमितता, सततची दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
Auto Rickshaw and Pratap Sarnaik

Auto Rickshaw and Pratap Sarnaik

sakal

Updated on: 

सोलापूर - निसर्गाची अनियमितता, सततची दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना आता उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शेतीवरील आर्थिक अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांत (२०२७ ते २०३१) अनाथांचा नाथ.. दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजनेंतर्गत तब्बल १ लाख प्रवासी ऑटो रिक्षांचे वाटप करण्याची महत्त्वाकांक्षी योजना लागू करण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

Loading content, please wait...