
सोलापूर : दक्षिण- पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातील अलमट्टी- जनमकुंटी- मुगळोळी- बागलकोट या ३५ किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी १४ ते २४ ऑगस्ट दरम्यान अनेक गाड्या रद्द किंवा मार्ग वळविण्यात आले आहेत. यामध्ये सोलापूर- होस्पेटसह तब्बल ९ गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे हम्पी होस्पेट, विजयपूर, धारवाडसह दक्षिण कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.