पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपुरातील कॉरिडॉरला भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे. हिंदूंच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कॉरिडॉरची अत्यंत गरज असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मंत्री राणे गुरुवारी (ता. ५) सांगोला दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी कॉरिडॉरबाबत भूमिका स्पष्ट केली.