ढोबळेंनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा: नितीन नागणे

ढोबळेंनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा: नितीन नागणे
Updated on: 
Summary

दोन दिवसापूर्वी माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली होती.

पंढरपूर (सोलापूर): राजकीय अस्तित्व संपलेल्या प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आधी स्वतःला सावरावे. सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका करून फुकटात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करु नये, असा टोला युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन नागणे यांनी येथे लगावला.

ढोबळेंनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा: नितीन नागणे
बिबट्याने पाडला पुन्हा वासराचा फडशा! चार दिवसांत दुसरी घटना

दोन दिवसापूर्वी माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माजी केंद्रीय मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर अडगळीत पडलेले ढोबळे हे प्रसिध्द माध्यमात पुन्हा चर्चेत आले आहेत. यावर आता कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही ढोबळेंच्या टिकेला प्रति उत्तर देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. युवक कॉंग्रेसच्या वतीने ढोबळेंच्या टिकेला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.

ढोबळेंनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा: नितीन नागणे
जिल्हाधिकाऱ्यांची अचानकपणे आरोग्य केंद्रास भेट

युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. नागणे म्हणाले की, प्रा. ढोबळे हे सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारांच्या बोटाला धरुन राजकारणात आले आहेत. शिंदे-पवार यांनीच त्यांना मानसन्मान आणि मंत्रीपद दिले. याचा त्यांना आता वयोमानानुसार विसर पडला आहे, शिक्षण संस्थेमधील आपली कुकर्म झाकण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. भाजप प्रेमाने आंधळे झालेल्या ढोबळेंचे राजकीय अस्तित्व आता संपुष्ठात आले आहे. मोठ्या नेत्यांवर टीका करुन फुकटात प्रसिध्दी मिळवण्यासाठीचा त्यांचा हा खटाटोप सुरू आहे. ही बाब देखील आता मंगळवेढ्यातील जनतेच्या चांगलीच लक्षात आली आहे. आपल्यापेक्षा मोठ्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आधी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा, मग कळेल त्यांना आपला राजकारणातील निर्देशांक किती घसरला आहे, अशी टिकाही नागणे यांनी केली.

ढोबळेंनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा: नितीन नागणे
पोषण आहारात मिळणार पौष्टिक पाव! शिक्षण विभागाच्या हालचाली

ढोबळेंना खासदारकीचे डोहाळे

ढोबळे यांना खासदारकीचे डोहाळे लागले आहे. शिंदे कुटुंबीयांवर टीका केली म्हणजे आपली भाजपात डाळ शिजेल, अशी त्यांना आशा आहे. पण राजकीयदृष्या अकार्यक्षम असलेल्या ढोबळेंना जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही श्री. नागणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com