23School_20fb_3.jpg
23School_20fb_3.jpg

शिक्षकांना सुट्टी नाहीच ! शाळा बंद, तरीही ऑनलाईनसाठी शाळेत येणे बधंनकारक

Published on

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहर- जिल्ह्यात 7 मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. तर या काळात शाळा बंद राहतील, असेही आदेश दिले. मात्र, शासनाच्या निर्बंधानुसार प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावा या हेतूने शिक्षकांनी शाळेत येऊन ऑनलाइन अध्यापन करणे क्रमप्राप्त आहे, असे माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

शिक्षणाधिकारी म्हणाले...

  • कोरोना वाढत असल्याने शाळा 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश
  • शाळा बंद असल्या तरीही शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे बंधनकारकच
  • शिक्षकांनी घरी बसून ऑनलाइन शिकविण्याबरोबरच शाळेच्या वेळेत शाळेतही ऑनलाइन शिकविणे आवश्‍यक
  • शासनाच्या निर्बंधानुसार शाळेत शिक्षकांची 50 टक्‍के उपस्थिती बंधनकारक
  • विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात रहावेत म्हणून शिक्षकांनी अध्यापनाकडे लक्ष द्यायलाच हवे
  • गृहभेटी उपक्रम आता बंद; 7 मार्चनंतर शाळांसबंधी होईल निर्णय

शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुन्हा सुट्ट्यांचा आनंद घेता येईल आणि घरी बसून विद्यार्थ्यांना शिकविता येईल, असे अनेक शिक्षकांना अनेकांना वाटले. मात्र, शिक्षकांना त्यांच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देऊन ते शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहतील, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. पुढील वर्षी संचमान्यता होणार असून विद्यार्थी संख्या कमी झालेल्या शाळांमधील शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्‍त होतील, अशी भितीही वर्तविली जात आहे. त्यामुळे पटसंख्या वाढविणे, विद्यार्थ्यांना अध्यापन करुन त्यांच्यातील शिक्षणाची गोडी कायम ठेवावी लागणार आहे. दरम्यान, प्राथमिक विभागचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड म्हणाले, शालेय शिक्षण विभागाकडून दर आठवड्याला स्वाध्याय संच दिला जातो. त्यातील 10 प्रश्‍नांची उत्तरे विद्यार्थ्यांना सोडविता येणे क्रमप्राप्त आहे. काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती यु-डायसला जोडली जाणार असून त्याठिकाणी प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रगती पाहता येणार आहे. त्यामुळे सर्व शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडेदेखील लक्ष द्यावे लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद असल्या तरीही, प्रत्येक शाळांमधील 50 टक्‍के शिक्षकांनी दररोज शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करणे संबंधितांवर बंधनकारक असेल. काही शाळांमध्ये कमी शिक्षक असतील, तरीही त्यातील निम्म्या शिक्षकांनी आज तर उर्वरित शिक्षकांनी उद्या, अशाप्रकारे उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी म्हणाले, घरी बसून ऑनलाइन शिकविणे अभिप्रेत नसून शाळांमधील शिक्षकांनी शाळेत येऊनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com