
पंढरपूर : पंढरपूर अर्बन बँकेच्या बारामती शाखेमधील व्यवस्थापकाने केलेल्या नऊ कोटी अपहाराचा कोणताही परिणाम बँकेच्या व्यवहारावर होणार नसून खातेदारांची सर्व रक्कम सुरक्षित आहे. याबाबत बँकेची सर्व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली.