
सांगोला: जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात डीजे सिस्टम व लेझर लाईटच्या वापरावर घातलेली बंदी झुगारत सांगोला तालुक्यातील सोनंद येथे विनापरवाना मिरवणूक काढून डीजे व लेझर शोचा वापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत डीजे व लेझर लाईटच्या वापराच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा जणांवर कारवाई केली आहे.