जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार स्मार्ट !

जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार स्मार्ट ! 100 अंगणवाड्यांची निवड, 13.70 कोटींचा निधी
जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार स्मार्ट
जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार स्मार्टEsakal

जिल्ह्यातील अंगणवाड्या आता स्मार्ट होणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी चालू वर्षी 13.70 कोटी निधी मंजूर झाला आहे.

माळीनगर (सोलापूर) : जिल्ह्यातील अंगणवाड्या आता स्मार्ट होणार आहेत. त्यासाठी अंगणवाडी इमारत बांधकामासाठी चालू वर्षी 13.70 कोटी निधी मंजूर झाला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सेसमधून ग्रामीण भागातील मुलींना साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी महिला बालकल्याण विभागामार्फत (Department of Women and Child Welfare) विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला व बालकल्याण विभागामार्फत शासनाकडील आदर्श अंगणवाडी योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 100 अंगणवाड्यांची स्मार्ट अंगणवाडी किटसाठी निवड करण्यात आलेली आहे. (Now hundred of Anganwadi schools in the district will be smart-ssd73)

जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार स्मार्ट
चिमणी पाडकामाबाबत "विधी व न्याय'ला महापालिकेचे पत्र !

ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रात प्रामुख्याने शेतमजूर, ऊसतोड कामगार व गरीब कुटुंबातील बालके असतात. या सर्व बालकांना स्मार्ट स्वरूपात पूर्व शालेय शिक्षण मिळावे, या हेतूने शासनाने अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट किट देण्याचे धोरण आखले आहे. याअंतर्गत एलईडी टीव्ही, सोलर लाइटीग सिस्टीम, ई-लर्निंग (E-Learning) सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हॅंडवॉश बेसिन, एज्युकेशनल पेंटिंग चार्टस आदी साहित्य मिळणार आहे. तसेच अंगणवाडी केंद्राची किरकोळ डागडुजी व दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे. हे साहित्य टप्प्या- टप्प्याने सप्टेंबरपर्यंत अंगणवाडी स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

चालू वर्षी 2021-22 मध्ये सर्वाधिक 13.70 कोटींचा निधी अंगणवाडी इमारत बांधकाम व दुरुस्ती कामांसाठी मिळवण्यास विभागाला यश मिळाले आहे. मागील तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात 208 अंगणवाडी बांधकामे व 937 अंगणवाडी दुरुस्ती कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून महिलांना व्यवसायाभिमुख साहित्य पुरवून त्यांचे जीवनमान उंचावणे, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना संगणकीय प्रशिक्षणाद्वारे त्यांचे तांत्रिक कौशल्य वृद्धी करणे आदी योजनांमधून महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहतील अशाप्रकारे कामकाजाचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील अंगणवाड्या होणार स्मार्ट
सोलापुरात 360 संशयितांमधून 92 जणांना डेंगी !

जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र

तालुकानिहाय स्मार्ट किटसाठी निवड झालेल्या अंगणवाड्या : अक्कलकोट (Akkalkot) - 11, बार्शी (Barshi) - 10, करमाळा (Karmala) - 8, माढा (Madha) - 9, माळशिरस (Malshiras) - 13, मोहोळ (Mohol) - 9, मंगळवेढा (Mangalwedha) - 8, उत्तर सोलापूर (North Solapur) - 4, पंढरपूर (Pandharpur) - 9, सांगोला (Sangola) - 11, दक्षिण सोलापूर (South Solapur) - 8.

पहिल्या टप्प्यात जरी 100 अंगणवाडी केंद्रांचा यामध्ये समावेश असला तरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महिला व बालकल्याण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त अंगणवाडी केंद्र स्मार्ट करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे.

- जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण, जिल्हा परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com