esakal | तर सांगोला तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या होईल 10 हजार; सर्वपक्षीय बैठकीत भिती 
sakal

बोलून बातमी शोधा

The number of Corona victims in Sangola taluka will be 10 thousand fears in the all party meeting

जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा विरोध 
या सर्वपक्षीय बैठकीमध्ये बहुसंख्य व्यापाऱ्यांनी बोलताना जनता कर्फ्यू करण्यापेक्षा इतर उपाययोजना कराव्यात असे सुचवले. त्यामुळे बहुसंख्य व्यापाऱ्यांचा जनता कर्फ्यूला विरोध असल्याचे दिसून आले. 

तर सांगोला तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या होईल 10 हजार; सर्वपक्षीय बैठकीत भिती 

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे, ही बाब खरी असली तरी सांगोल्यात जनता कर्फ्यूबाबत कोणताही निर्णय लादला जाणार नाही. याबात सर्वानुमते निर्णय घेतला जाईल. परंतु आपण असेच गाफील राहिलो तर 15 दिवसात तालुक्‍यात 10 हजार तर शहरात दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण होतील, अशी भिती आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. 
रविवार (ता. 6) रोजी सांगोला येथील अहिल्यादेवी होळकर सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, नगराध्यक्षा राणी माने, चेतनसिह केदार, पी. सी. झपके, रफिक नदाफ, प्रफुल्ल कदम, सभापती राणी कोळवले, उपसभापती तानाजी चंदनशिवे यांच्यासह शहरातील व्यापारी, नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
आमदार पाटील म्हणाले की, व्यापाऱ्यांनीही व्यापार करताना शासनाच्या नियमाचे पालन केले पाहिजे. माजी आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही. निर्णय घ्यायचा झाल्यास शासकीय अधिकारी यांना सहभागी करून घ्यावे लागेल. नियमांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनाच करावी लागणार आहे. दोन दिवसात अधिवेशन होणार आहे. त्यामध्ये कोणता निर्णय होतोय तेही पाहवे लागेल. माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील म्हणाले, सर्वच निर्णय अधिकाऱ्यांवर सोपवून चालणार नाही. काही निर्णय लोकप्रतिनिधी म्हणून आपणास घ्यावे लागतील. शहर व तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची उगमस्थाने शोधून त्या ठिकाणी नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. येत्या चार ते पाच दिवसात शहरातील सर्व व्यापाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेऊन एक नवीन सांगोला पॅटर्न राबविण्याबाबत निर्णय घेवू. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार, पी. सी. झपके, सुरेश माळी, प्रफुल्ल कदम, नवनाथ पवार, नागेश जोशी, रविंद्र कांबळे, अरविंद केदार, इर्शाद बागवान, विनोद बाबर यांनी विचार व्यक्त केले. 

बैठक जनता कर्फ्यूची चर्चा मात्र प्रशासनाच्या दूर्लक्षपणाची 
सांगोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जनता कर्फ्यू करावा का, यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अनेक जणांनी जनता कर्फ्यूवर मत व्यक्त करताना प्रशासनाच्या हलगर्जीपणाची तसेच कोविड केअर सेंटरवर सुविधा नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी सांगण्यात आल्या. त्यामुळे बैठक जरी जनता कर्फ्युबाबत असली तरी अनेकांनी समस्या मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणाच्या व कोविड सेंटरमधील विविध समस्याच मांडल्या गेल्या. 

संपादन : वैभव गाढवे