esakal | ऑनलाइन ग्राहकांची संख्या 30 हजाराने वाढली 
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाइन ग्राहकांची संख्या 30 हजाराने वाढली 

"ऑनलाइन' बिल भरल्यास 0.25 टक्के सूट 
लघुदाब वीजग्राहकांसाठी "ऑनलाइन' बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय, भीम, इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. ही सूट मिळविण्यासाठी संबंधित ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी नसावी तसेच वीजबिलाचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्‍यक आहे. 

ऑनलाइन ग्राहकांची संख्या 30 हजाराने वाढली 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः महावितरणचे संकेतस्थळ व मोबाईल ऍपद्वारे "ऑनलाइन' वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांची संख्या गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात 30 हजारांनी वाढली आहे. वीजबिल भरणा केंद्रातील गर्दी टाळण्यासाठी तसेच रांगेत उभे राहण्याऐवजी शक्‍यतो वीजग्राहकांनी वीजबिलाचा भरणा घरबसल्या "ऑनलाइन'द्वारे करण्याचे आवाहन महावितरणकडून केले आहे. 

महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व मोबाईल ऍपद्वारे वीजबिल भरण्यास वीजग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. बारामती परिमंडलामध्ये गेल्या सहा महिन्यात "ऑनलाइन' वीजबिल भरणा करणाऱ्या वीजग्राहकांच्या संख्येत 81 हजारांनी वाढ झाली आहे. यात सोलापूर जिल्ह्यात 30 हजार 500, सातारा जिल्ह्यात 26 हजार 200 आणि बारामती, इंदापूर, शिरूर, दौंड, पुरंदर व भोर तालुक्‍यातील (जि. पुणे) 24 हजार 300 ग्राहकांचा समावेश आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 500 ग्राहकांनी ऑगस्ट 2019 मध्ये वीजबिलाचा "ऑनलाइन' भरणा केला होता. त्या तुलनेत जानेवारीमध्ये एक लाख 31 हजार ग्राहकांनी "ऑनलाइन' भरणा केला आहे. यात अकलूज विभागामध्ये दोन हजार 800, बार्शी विभाग पाच हजार 600, पंढरपूर विभाग सहा हजार 800, सोलापूर ग्रामीण विभागात पाच हजार 800 तर सोलापूर शहर विभागात नऊ हजार 500 अशा एकूण 30 हजार 500 ग्राहकांची संख्या सोलापूर जिल्ह्यात वाढली आहे. 

"ऑनलाइन' बिल भरणा निःशुल्क- क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी "ऑनलाइन'चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलाचा "ऑनलाइन' भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबिट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून "ऑनलाइन'द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे. 
महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना "ऑनलाइन' बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट व मोबाईल ऍपची सेवा उपलब्ध आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्डसचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाइट व मोबाईल ऍपवरून घरबसल्या वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 


 

loading image