रुग्णांची संख्या 37; संचारबंदी सोमवारपर्यंत वाढणार : पालकमंत्री भरणे 

Number of patients 37 curfew to be extended till Monday say Guardian Minister bharne
Number of patients 37 curfew to be extended till Monday say Guardian Minister bharne
Updated on

सोलापूर : सोलापूर शहरातील संचारबंदी आणखी चार दिवसासाठी वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. त्याच बरोबर कोरोनाचे आज शहरात नवे चार रूग्ण आढळले असून बाधित रुग्णांची संख्या 33 वरून 37 झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
श्री. भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी कालच निवड करण्यात आली आहे. पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. कोरोनाशी संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक त्यांनी आज घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 
सोलापूर शहरातील संचारबंदीची मुदत आज रात्री बारा वाजता संपणार होती. शहरात आज दुपारपर्यंत आणखीन चार नवे कोरोनाचे बाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची संख्या आता 33 वरून 37 इतकी झाली आहे. ही माहिती आज दुपारी जिल्ह्याचे नवे पालकमंत्री भरणे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Historic Ritual: Fadnavis Offers Mahapuja to Bhagwant for the First Time
Photo
Why was Vande Bharat delayed in Pune?
Solapur Tour May Decide Fate of Long-Pending Rail Project
Marathi News Esakal
www.esakal.com