सोलापुरातील रुग्णसंख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर ! आज 21 पॉझिटिव्ह; विजयपूर रोडवर सात, साखर पेठेत तीन रुग्ण 

31Corona_20akola_2001_1_3.jpg
31Corona_20akola_2001_1_3.jpg
Updated on

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या आता नऊ हजार 977 झाली आहे. शहरात सणासुदीनिमित्ताने बाजारपेठांमध्ये सर्रासपणे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. गर्दी वाढलेली असतानाही शहरातील कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढलेले नाही. आज 250 संशयितांमध्ये 21 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 15 नोव्हेंबरला रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या माणिक चौकातील 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख नऊ हजार 708 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 977 कोरोना पॉझिटिव्ह 
  • शहरातील एकूण आठ हजार 971 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • एकूण रुग्णांपैकी 555 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
  • आज 250 संशयितांमध्ये एकूण 21 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 

शहरात आज ओम गर्जना चौक परिसर, विजयालक्ष्मी आर्केड (रेल्वे लाईन), जुनी पोलिस लाईन (मुरारजी पेठ), गवळी वस्ती (मरिआई चौक), विष्णुपुरी (जुळे सोलापूर) व गजानन नगर येथे प्रत्येकी एक, विजयपूर रोड परिसरात सात, सोहन प्लाझा (सैफूल) येथे दोन, नारायणकर अपार्टमेंट (साखर पेठ) येथे तीन रुग्णांची भर पडली आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता दहा हजारांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 98 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर 41 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये असून 26 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आज शहरातील 19 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, शहरातील गर्दी वाढल्याने नागरिकांनी मास्कचे वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com