
सोलापूर : सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्यक ठरते; अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात.
पूर्वी ही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेइतिहास मिळवण्यात अडचणी येत असत. ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे. संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे.
महाराष्ट्र सरकार ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. सध्या या वेबसाईटवर 14 लाख 22 हजार 958 दस्तऐवज डाउनलोड केलेले असून वेबसाईटला व्हिजिट केलेल्यांची संख्या 5 लाख 17 हजार 196 आहे. माहिती मिळवण्यासाठी आपल्याला aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्यात आपल्याला "लॉग इन आयडी' आणि "पासवर्ड' बटणांच्या खाली "मदत' या बटणावरून वेबसाइटद्वारे डाउनलोड करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे उपलब्ध आहेत? माहिती शोधासाठी नवीन लॉगइन कसे तयार करावे? पासवर्ड कसा बदलावा? कोणत्या पॅरामीटर्सवर/मापदंडावर दस्तऐवज शोधणे शक्य आहे? मूलभूत शोध आणि प्रगत शोधमध्ये काय फरक आहे? मूलभूत शोध पर्याय वापरून शोध कसा घ्यावा? प्रगत शोध पर्याय वापरून शोध कसा घ्यावा? "पुन्हा योजना' बटण कधी वापरावे? आदींसंबंधीची मार्गदर्शक सूचना व आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.
आता या वेबसाईटवर जुने अभिलेख (फेरफार, सातबारा व खाते उतारे) असे पाहा...
असा पाहा फेरफार उतारा...
पाहा जमिनीचा नकाशा ऑनलाइन...
पीएम किसान योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करायची? किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके फायदे काय? सातबारा उताऱ्यात महाराष्ट्र सरकारने केलेले 11 बदल, ऑनलाइन सातबारा उतारा कसा काढायचा? तो कसा वाचायचा? या पत्रकावरील खाली बाण असलेल्या चिन्हावर तुम्ही क्लिक केलं की ते डाउनलोड होईल. त्यानंतर फेरफार उतारा पाहू शकता. याच पद्धतीनं तुम्ही सातबारा असा अभिलेखाचा प्रकार निवडला आणि आधी सांगितल्याप्रमाणे प्रकिया केली तर जुना सातबारा उताराही इथं पाहू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.