"नो चायना, नो प्लास्टिक, ओन्ली स्वदेशी'! बार्शीच्या महिलांनी बनवलेले आकाश कंदील खाताहेत भाव 

Barshi Aakash Kandil
Barshi Aakash Kandil
Updated on: 

बार्शी (सोलापूर) : देशासह राज्यात कोरोना विषाणूने हाहाकार निर्माण केला अन्‌ तब्बल सात महिने झाले अर्थव्यवस्था ढासळली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, भांडवल संपले पण बार्शीच्या रणरागिणींनी धैर्याने संकटाशी सामना करून बचत गटाच्या माध्यमातून खंबीर पावले टाकली असून, पारंपरिक दिवाळी सणानिमित्त "नो चायना, नो प्लास्टिक, ओन्ली स्वदेशी' असे म्हणत दीड लाखांचे स्वदेशी आकाशकंदील तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. 

बार्शी नगरपालिकेच्या बचत गटाच्या माध्यमातून 2011 मध्ये गुलिस्तान ए हिंद सहायता बचत गटाची स्थापना झाली. या बचत गटामध्ये बारा महिला कार्यरत आहेत. लाखो रुपयांचा व्यवहार करून बचत गटाला मिळालेल्या नफ्यातून 4 लाख 50 हजार रुपये कायमस्वरूपी अंतर्गत शिल्लक ठेवले असून, कोणत्याही बॅंकेला पैसे न मागता बचत गटातील महिलेला अडचण आल्यास त्यातून आर्थिक मदत त्वरित दिली जाते. 

बचत गटाच्या अध्यक्षा सायरा मुल्ला असून, सचिवा नजमा शेख आहेत तर अफसाना आतार, सादिया काझी, यास्मीन काझी, नजीरुन पठाण, फातेमा विजापुरे, हसीना शेख, बानू शेख, सलिमा पठाण, निशाद मुलाणी, फरजाना शेख या सदस्या आहेत. या सर्वांना माजी नगरसेविका रिजवाना शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. 

दिवाळीमध्ये बचत गटाला आयडिया सुचली अन्‌ प्लास्टिक वस्तू, चायना वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे ठरवून स्वदेशी आकाश कंदील बनवण्यासाठी पुणे येथील नीता ठाकूर यांच्याकडून सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले. एक लाख 18 हजारांची गुंतवणूक करून 100 रुपये मीटरपासून 600 रुपये मीटरपर्यंतच्या कापडाची खरेदी केली. त्यापासून या महिलांनी आकर्षक आकाश कंदील तयार केले आहेत. 

भारतीय संस्कृतीप्रमाणे परंपरेनुसार समाजामध्ये विविध सण साजरे होतात. प्रत्येक सणाला वेगवेगळे स्टॉल उभा करून वस्तूंची विक्री करून किमान नफा मिळवण्याचा या महिला बचत गटाने आदर्श ठेवला आहे. बचत गटाने सात महिने लॉकडाउन काळात 21 अंगणवाड्यांना मास्क, सॅनिटायझर, गोळ्यांचे वाटप केले आहे. श्रमदान, शैक्षणिक साहित्याचे वाटप केले असून, जागतिक महिला दिनानिमित्त आजपर्यंत विविध सामाजिक संस्थांकडून सहा वेळा या बचत गटास पारितोषिके देऊन गौरवण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com