सोलापुर : कार व मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यु ; तिघे जखमी

भरधाव वेगाने निघालेल्या टाटा कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला कार मधील तिघे जण गंभीर जखमी झाले
car and motorcycle accident
car and motorcycle accidentsakal

सोलापुर : भरधाव वेगाने निघालेल्या टाटा कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाला कार मधील तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात 25 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता यावली ता मोहोळ गावच्या शिवारातील अनगर फाटया जवळ झाला. यासीन बाबुलाल कमलीवाले (वय 24 वर्ष, रा. जवाहर नगर, पाथरुट चौक सोलापूर) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.(One killed in car and motorcycle accident Three injured)

car and motorcycle accident
मोहोळ : कोरोना मृतांच्या वारसासाठी तीन दिवशीय मदत शिबीराचे आयोजन

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, जवाहर नगर सोलापूर येथील यासीन बाबूलाल कमलीवाले हे शेळ्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवार ता 25 डिसेंबर रोजी ते शेळ्या खरेदी विक्री करण्यासाठी अनगर ता मोहोळ येथील आठवडी बाजारात गेले होते. सकाळी साडेनऊ वाजता ते दुचाकीने (एम.एच.13. डी.के. 5643) वरून परत सोलापूरकडे येत होते. त्यावेळी यावली गावच्या शिवारात पुण्याहून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने निघालेल्या टाटा कारने (आर.जे. 14. यु.एफ. 6937) या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. तर कार चालकासह अन्य एक पुरुष व दाेन महिला गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात पाठवून दिले. त्यांची नावे समजू शकली नाहीत.

car and motorcycle accident
NEP नुसार शिक्षक घडविणारी देशातील पहिली संस्था पुण्यात!

या प्रकरणी मोसीन बाबूलाल शेख (रा. सोलापूर) यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे जवाहर नगर सोलापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com