सोलापूर : मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यु, एक जखमी

मोहोळ शहराजवळील सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली
सागर चव्हाण
सागर चव्हाणSakal
Updated on

मोहोळ - गावाकडे घराच्या वास्तुशांतीसाठी पुण्याहून निघालेल्या मोटरसायकल वरील दोन युवकांना पाठीमागून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक वाहनाने धडक देऊन झालेल्या अपघातात एक 24 वर्षीय मोटर सायकलस्वार जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ता. 2 मे रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोहोळ शहराजवळील सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कन्या प्रशाला चौकामध्ये घडली. सागर विश्वनाथ चव्हाण वय 24 रा शावळतांडा असे मृताचे नाव आहे. तर सचिन सहदेव चव्हाण असे जखमीचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शावळ तांडा (ता. अक्कलकोट) येथील सागर विश्वनाथ चव्हाण (वय 24) तर सचिन सहदेव चव्हाण (वय 25) हे पुणे येथे कंपनीमध्ये नोकरीला आहेत. सागर चव्हाण यांच्या घराची वास्तुशांती असल्यामुळे ता 1 मे च्या रात्री ते पुण्याहून मोटार सायकल क्रमांक एम एच 12 एस झेड 6220 वरून गावाकडे निघाले होते. ते दोघे मोहोळ येथील कन्या प्रशाला चौकातील गतीरोधका वर आले असता पाठीमागून वेगात येणाऱ्या मालवाहतूक क्रमांक एम एच 24 ए यु 5202 या वाहनाने मोटर सायकल ला पाठीमागून जोराची धडक दिली व मोटरसायकल पुढे जाऊन दुभाजकावर आदळली. यामध्ये मोटरसायकलस्वार सागर विश्वनाथ चव्हाण याच्या डोक्यास, हातास मार लागून गंभीर जखमी होऊन तो जागीच मयत झाला, तर पाठीमागे बसलेला सचिन सहदेव चव्हाण याच्या डोक्यास व हातास मार लागून तो जखमी झाला आहे. त्यास मोहोळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी अविचाराने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून, गती रोधका वरून जाणाऱ्या डबलसीट मोटरसायकलला धडक देऊन एकाच्या मृत्युस तर एकाला जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याबाबत मालवाहतूक करणाऱ्या वाहनावर शेडजी लालू चव्हाण यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

BJP leader Sudarshan Yadav hit back at Shiv Sena MP Sanjay Raut, condemning his remarks against Guardian Minister Jaykumar Gore.
Solapur Accident
IPS solapur SP Atul Kulkarni
Solapur city police raid
Marathi News Esakal
www.esakal.com