रब्बीत एक, तर उन्हाळ्यात शेतीला मिळणार दोनदा पाणी ! कालवा सल्लागार समितीपुढे प्रस्ताव

ujani dam
ujani dam
Updated on: 

सोलापूर : दरवर्षी रब्बी हंगामासाठी दोन, तर उन्हाळ्यात उजनी धरणातून एक आवर्तन सोडले जात होते. मात्र, रब्बीच्या तुलनेत उन्हाळ्यात पाण्याची मोठी गरज भासत असल्याने जलसंपदा विभागाने पूर्वीच्या नियोजनात आता मोठा बदल केला आहे. शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामात एक, तर उन्हाळ्यात दोन आवर्तने मिळणार आहेत. तसा प्रस्ताव पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी तयार केला असून, आता त्यावर कालवा सल्लागार समितीत शिक्‍कामोर्तब होणार आहे.

कालवा सल्लगार समितीत अंतिम निर्णय
रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची खूप गरज भासते. गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर उन्हाळ्यात दोन आवर्तने, तर रब्बी हंगामात एक आवर्तन सोडले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता तसा प्रस्ताव कालवा सल्लगार समितीपुढे ठेवला जाईल.
-धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे, सोलापूर

जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात मोठी घट झाली असून, रब्बीच्या तुलनेत शेतकऱ्यांकडून उन्हाळ्यातच पाण्याची अधिक मागणी होऊ लागली आहे. पावसाळा नुकताच संपल्याने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने साधारणपणे डिसेंबरपर्यंत पाणीटंचाई भासत नसल्याचेही निदर्शनास आले. रब्बी हंगामात दोन आवर्तने सोडूनही शेतकऱ्यांकडून उन्हाळ्यात दोन आवर्तनाची मागणी केली जात होती. दरम्यान, पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ होत असून, ज्वारीच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याचे चित्र आहे. हंगामी पिकांकडेही शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडण्याच्या दृष्टीने गतवर्षीही नियोजन करण्यात आले होते. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर हा बदल आता कायमस्वरुपी ठेवला जाणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यावेळी रब्बीचे पहिले आवर्तन सोडण्यासंबंधीचाही निर्णय होणार आहे.

'उजनी'ची सद्यस्थिती

  • एकूण टक्‍केवारी
  • 110.02 टक्‍के
  • एकूण पाणीसाठा
  • 122.60 टीएमसी
  • उपयुक्‍त पाणीसाठा
  • 58.94 टीएमसी
  • एका आवर्तनातून मिळणारे पाणी
  • 10 ते 12 टीएमसी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Division Teachers Constituency
Drought Relief for Maharashtra Farmers Limited to Two Hectares as Officials Survey Crop Damage Across 265 Talukas
Global Recording of 'Chrysilla Volup' in Madha College Campus; Major Milestone in Biological Research
Maharashtra Drought Crisis Hits Pandharpur as Three Month Rain Break Threatens Rabi Season and Farmer Livelihoods
Marathi News Esakal
www.esakal.com